Back

हनुमान विद्यालय शिंदेवाडी च्या विद्यार्थ्यांची इंस्पायर अवॉर्ड साठी निवड…

शिंदेवाडी (ता. माळशिरस ) / अनिल पवार - केंद्र सरकार च्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने  इंस्पायर अवॉर्ड 2020-21 या उपक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे, हनुमान विद्यालय & ज्यु. कॉलेज शिंदेवाडी मधील यशराज धनाजी देशमुख इयत्ता 6 वी  व शिवतेज बापूराव मुळीक  इयत्ता 8 वी मधील विद्यार्थ्यांची हनुमान विद्यालय शिंदेवाडी यांच्या विज्ञान उपक्रमाची निवड करण्यात आली. यासाठी त्यांना 10000 रुपये शिष्यवृत्ती मिळाली. या निवडीबद्दल प्राचार्य श्री सूर्यकांत  भालेराव , सौ. देठे मॅडम पर्यवेक्षिका, विज्ञान शिक्षक  श्री. लिंगे सर, श्री.सचिन पाटील श्री. बालाजी बोंबडे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. या दोन्हीही विद्यार्थ्यांचे हनुमान विद्यालय & ज्यु. कॉलेज शिंदेवाडी व शिंदेवाडी मधील ग्रामस्तांनी त्यांचे अभिनंदन केले.

वात्सल्य न्यूज महाराष्ट्र