Back

डॉ.नंदकिशोर शितोळे (आण्णा) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

सोलापुर / अनिल पवार – डॉ. नंदकिशोर शितोळे ( आण्णा) हे शिंदेवाडी पंचक्रोशातील वैद्यकिय क्षेत्रात नामांकित असे प्रसिद्ध डॉ. होते. ते वैद्यकिय क्षेत्रात योग्य तो सल्ला देवून पेशंटला नुसते बोलून आधार देवून निम्मा आजार बरा करत होते. पेशंट  रडत-खडत तोंड वाकडे –तिकडे करून जरी दवाखान्यात आले तरी पण घरी जाताना हसतच घरी जात होते. काही पेशंटला नुसता हात जरी लावला तरी त्यांचा आजार पळून जात होता. काही पेशंट नुसत्या गोळ्या औषधावरच बरे होत होते. पेशंट समोर दिसताच ते पेशंटला काय आजार झाला आहे हे ओळखून उपचार करत होते. कधीही पैसे कमविण्यासाठी किंवा लोकांना लुबाडण्यासाठी त्यांनी डॉक्टरी पेशाचा वापर केला नाही. आणि गोर-गरीब लोकांकडून कधीही जास्त पैशाची मागणी केली नाही. मिळेल तेवढ्या पैशावर समाधान मानत होते. त्यामुळे ते शिंदेवाडी पंचक्रोशातील सर्वांचे लाडके फॅमिली डॉ. झाले होते. प्रत्येक पेशंटला ते आपला फॅमिली सदस्य असे समजून उपचार करत होते. तसेच त्यांनी एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही देखील नाव लौकिक मिळविला होता. राजकारणात देखील मुरब्बी राजकारणी लोकं त्यांचा सल्ला घेत होते. गावात जरी काही चुकीचे घडत असेल तर स्पष्ट रोखठोक आपली भूमिका मांडत होते. असे शिंदेवाडी पंचक्रोशातील प्रसिद्ध डॉ. नंदकिशोर शितोळे ( आण्णा) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे तरी त्यांचा चिरकाल आत्म्यास शांती लाभो! हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अश्या आण्णांच्या अचानक जाण्यानं समस्त ग्रामस्थ व संपूर्ण शिंदेवाडी व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्त व त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.