Back

गावच्या विकांस कामांवर आक्रमक होऊन तरूण पिढीची राजकारणात एंट्री...

सोलापूर / अनिल पवार – कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपून देखील निवडणुका रखडल्या होत्या. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. माळशिरस तालुक्यातील राजकीय क्षेत्रात सक्रिय व बहुचर्चित म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिंदेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दि. २३ डिसेंबर २०२० पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नवीन तरूण उमेदवार तर पूर्ण ताकतीने मतदारांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे गुप्त बैठकांनी चांगलाच जोर धरला आहे.पण पाठीमागचा विकास पाहता संपुर्ण तरूण पिढी नाराजी व्यक्त करत आहे. जुन्या विचाराचे नेते मंडळी फक्त लोकांचा वापर करून घेत आहेत.पण तरूण पिढीला हे मान्य नाही. आणि ग्रामपंचायत निवडणूक ही विधानसभेपेक्षा कठीण असते, प्रचंड चुरशीची असते अशा कहाण्या सर्वत्र पसरल्या आहोत. या निवडणुकांचा गावावर काय परिणाम पडतो? गावाचा काय फायदा किंवा तोटा होतो? निवडणुकीमुळे गावात समूहशासन किंवा ग्रामस्वराज्य स्थापन झाले का? ग्रामउद्योग उभे राहिले का? गावाचा सर्वांगाने विकास झाला का? तर दुर्दैवाने या सा-यांचे उत्तर ब-याच प्रमाणात नकारार्थी  येते म्हणून तरूण पिढी पुढाकार घेत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतात, अनेक वेळा भांडणं-वाद निर्माण होतात. गाव हा पक्षांमध्ये, जातीमध्ये विभागाला जाऊन भावकी आणि समाजामध्ये दुफळी निर्माण होते. निवडणुकीच्या दरम्यान दारूचा वापर होत असल्याने तरुणांना दारुचे व्यसन लागते. निवडणुकीत पैसा खर्च केल्याने गावातील उमेदवार कर्जबाजारी झाल्याचे चित्र सुद्धा अनेकदा बघायला मिळते. गाव पातळीवर निवडणुकीनंतर सुद्धा समर्थक-विरोधक रोज एकमेकांसमोर येत असतात, नेहमी थोडेफार खटके उडतंच असतात. त्यामुळे अनेकदा फक्त विरोधाला विरोध होत असतो. निवडून आलेले उमेदवार हे सर्वमताचे नसून बहुमताचे असल्याने ग्रामसभेत एक तर पराभूत पक्षाचे लोक येतंच नाही किंवा आले तर फक्त गदारोळ होतो. कुठल्याही विषयावर सविस्तर चर्चा होत नाही. विषय निकाली लागले जात नाही. गावविकासाच्या कामातला लोकसहभाग त्यामुळे कमी होतो. गावांसोबत काम करणा-या अनेक सामाजिक संस्थांचा अनुभव असा आहे की, निवडणुकीनंतर साधारण १ वर्ष गावात ताणतणाव असतो, लोकसहभागातून करण्याच्या कामाला अनेक मर्यादा येतात. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था गावाच्या विकासासाठी उदासीन असतात. सहभागी होत नाहीत. कोणत्याही निवडणुका आल्या की, विशेषतः ग्रामीण भागात ईर्ष्या, चढाओढ, मी मोठा की तू मोठा असे म्हणत निवडणुकां दरम्यान धुमशान घडून धुमश्चक्री उडते. प्रसंगी संपूर्ण गावास वेठीस धरले जाते. निवडणुकांमध्ये दुभंगलेली मने पुन्हा कधीही जुळून येत नाहीत. त्यामुळे भावकी गावकीत पिढ्यानपिढ्या संघर्ष सुरु राहतो. त्यामुळे गावच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर खीळ बसतेच. परंतू त्यापेक्षाही गावातील निकोप वातावरण गढूळ होते, याची प्रचिती गेली काही वर्षानुवर्षे लोकं अनुभवत आलेले आलेत. म्हणुन नवीन तरून हुशार, वैचारीक व तज्ञ अशा तरूण पिढीने राजकारणात एंट्री करून गावचा इतिहास बदलण्याचा व गावचा विकास करण्याचा विढा उचललेला आहे.

वात्सल्य न्यूज महाराष्ट्र